आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी अधिकाऱ्यांनाच नाही बियाणे, औषधांचा ठाव! केंद्रीय पथकाच्या प्रश्नांनी बोलती बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खरिपाच्या तोंडावर बोंडअळीमुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोणती औषधे फवारली, खते-बियाणे कोणते वापरली, याबाबत शेतकऱ्यांना विचारणा केली. हाच प्रश्न कृषी अधिकाऱ्यांना विचारताच त्यांना काहीच सांगता आले नाही. त्यामुळे पथक प्रमुख तथा सहसचिव अश्विनीकुमार यांनी औषधांची तुम्हालाच माहिती नसेल तर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणार, असा सवाल करत या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पथकाने प्रथम गाढेजळगाव, शेकटा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. गाढेजळगावात उपसरपंच रहीम पठाण यांनी हेक्टरी अडीच क्विंटल उत्पादन झाल्याचे सांगितले. दोनच वेचण्या झाल्याने खर्चही निघाला नाही, असेही ते म्हणाले. शेकटा येथील दत्तात्रय जाधव यांना २ हेक्टरमध्ये फक्त ९ क्विंटल कापूस झाला. 


आत्ता पाहणी कशी ? 
कापूस पूर्णपणे काढून टाकल्यानंतर बोंडअळीची पाहणी होत आहे. या पाहणीचा उपयोग काय, वेळीच पाहणी का केली नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. बोंडअळीच्या नुकसानीची मदतही राज्य सरकारने याआधीच जाहीर केलेली आहे. विशेष म्हणजे शेतात कापूस नसल्यामुळे अधिकाऱ्यांना पाहणीही करता आली नाही. 

बातम्या आणखी आहेत...