आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओतील एजंटला ९०० रुपयांची लाच घेताना पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चारचाकी वाहनाचा परवाना काढून देण्यासाठी अर्जदाराकडून ९०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या आरटीओतील दलालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. शब्बीर खान हबीब खान (६६, रा. रेल्वेस्टेशन परिसर) असे त्याचे नाव आहे. 


शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता आरटीओ कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. एजंटने १२०० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ९०० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन देशमुख, अश्वलिंग होनराव, दिगंबर पाठक, संतोष जोशी, मिलिंद इप्पर यांच्या पथकाने कारवाई केली. 

बातम्या आणखी आहेत...