आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतपीठाऐवजी पैठणला स्वतंत्र संत विद्यापीठ; केंद्राला तातडीने प्रस्ताव पाठवणार : विनाेद तावडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पैठण (जि. अाैरंगाबाद) येथे संतपीठासाठी भव्य जागेवर माेठी इमारत उभी अाहे. या ठिकाणी अाता संतपीठाएेवजी संत विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. या विद्यापीठाची उर्वरित कामे मार्गी लागावीत यासाठी राज्य सरकार एक प्रस्ताव तयार करून ताे तातडीने केंद्रीय मनुष्यबळ विभागाला पाठवेल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी नागपुरात झालेल्या बैठकीत दिली. 


पैठण येथे संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय सर्वप्रथम १९८१ मध्ये मुख्यमंत्री बॅ. अ. र. अंतुले यांनी घेतला हाेता. त्यानंतर शरद पवार, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना परत असाच निर्णय घेऊन त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. २०१४ मध्ये संतपीठाची इमारत उभी राहिली, त्याचे थाटात उद््घाटनही झाले. मात्र, या ठिकाणी अद्यापही अध्यापन, संशोधन, साहित्य लिखाण, विद्यार्थी घडवण्याचा उपक्रम सुरू झालेले नाही. याबाबत दैनिक दिव्य मराठीने २० जून व ३ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केला हाेता. त्याची तातडीने दखल घेऊन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून एक बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १० जुलै रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात संतपीठाची काेणकाेणती कामे पूर्ण झाली व काेणकाेणती रखडली याबाबत अाढावा घेण्यात अाला. 


डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून प्र-कुलगुरू अशोक तेजनकर यांनी आपली भूमिका मांडली. तर अखिल भारतीय वारकरी महामंडळ, विश्व हिंदू परिषद, संत साहित्य अभ्यासकांनी संतपीठाऐवजी स्वतंत्र संत विद्यापीठच पैठणमध्ये सुरू करावे, अशी मागणी केली. त्याला सरकारकडूनही अनुकूल प्रतिसाद देण्यात अाला. या बैठकीस सुरुवातीच्या काही वेळ मुख्यमंत्री स्वत: उपस्थित हाेते. त्याशिवाय अामदार अतुल सावे, संदिपान भुमरे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डाॅ. भागवत कराड, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ महाराज आंधळे, संत साहित्य अभ्यासक डॉ. प्रमोद कुमावत, विठ्ठल शास्त्री चनघटे, एकनाथ महाराज वाघ, विश्व हिंदू परिषदेचे संजय जोशी, डॉ. दिवाकर कुलकर्णी, महेश पाटील, विद्यापीठाचे अशोक तेजनकर, पैठण नगर परिषदेचे नगराध्यक्ष सूरज लोळगे अादी उपस्थित हाेते. 


अभ्यासक्रमावर चर्चा 
विद्यापीठाच्या कार्यवाहीची आढावा बैठक १० ऑक्टोबर रोजी होईल. कोणते अभ्यासक्रम असावेत यावर चर्चा होईल. पुढील जूनपासून वर्ग सुरू होतील, असे नियोजन आहे. औरंगाबादचे माजी उपमहापौर संजय जोशी यांच्यावर पाठपुराव्याची जबाबदारी असेल. 

बातम्या आणखी आहेत...