आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास कदमांनी मला निवडणुकीत हरविण्याचा विडा उचलला होता, अनंत गीतेंचा गौप्यस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कदम यांनी मला निवडणुकीत पराभुत करण्याचा वि़डा उचलला होता पण त्यांच्या मुलाला आमदार करायचे असल्याने त्यांनी माझी दिलगिरी व्यक्त केली होती. असे विधान गीते यांनी केले आहे. ते औरंगाबाद शिवसेना शाखेच्या वर्धापन कार्यक्रमात बोलत होते. 

 

गीते यांनी आपल्या भाषणात म्हटले की, माझ्यावर जी वेळ आली ती इतर कुणा शिवसैनिकावर येऊ नये. याकरता शिवसैनिकांनी आपल्या काम चोखपणे पार पाडणे गरजेचे आहे. यावेळी व्यासपीठावर खासदार चंद्रकात खैर, महिला अध्यक्ष मनीषा कायंदेसह आमदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

गीते म्हणाले, ''लोकसभा निवडणुकीत मी कमी मताने निवडून आलो. माझी पीछेहाट का झाली तर मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शेतकरी कामगार पक्षाविरोधात लढलो. एवढेच नाही, तर स्वकियांसोबत म्हणजेच रामदास कदम यांच्यासोबतही लढलो. त्यांनी मला पाडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मी विजयी झालो. त्यांनी माझी दिलगिरी व्यक्त केली, कारण त्यांच्या मुलाला आमदार करायचं होतं. तसा प्रसंग महाराष्ट्रात कुणाच्याही नशिबी येऊ नये एवढीच अपेक्षा आहे.

 

शिवसैनिकांना स्वबळाची दिली शपथ 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर युती होणार की काय, अशी चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी औरंगाबादेत बोलताना शिवसेना नेते अनंत गीते यांनी युती नाहीच, स्वबळावरच लढायचे आहे, असे जाहीरपणे सांगितले. वज्रमूठ आवळून कामाला लागा, असे सांगतानाच सर्वांना मूठ आवळून शपथ घ्यायलाही लावली.

बातम्या आणखी आहेत...