आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त जमावाची अजिंठा ठाण्यावर दगडफेक, पोलिस वाहन फोडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

अजिंठा -  अजिंठ्यात गुरुवारी संध्याकाळी बस स्टेशन जवळ मशिदीत नमाज चालू होती. याच वेळेस एका लग्नात डीजे वर गाणे चालू  असताना डीजे बंद करावे. या कारणावरून दोन गटांत बाचाबाची व हाणामारी झाली. नंतर गावात एकदम तणाव झाला. दोन्ही गट समोरासमोर आले. एक गट पोलिस ठाण्यावर चालून गेला.

 

अचानक पोलिस ठाण्यावर दगडफेक सुरू केली. यात पोलिस जीपच्याही काचा फोडल्या.  दरम्यान सिल्लोड शहर, ग्रामीण व फर्दापूर आदी पोलिस फोर्स गावात  दाखल होऊन गावात जमावाला पांगवले.  रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...