आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहाची पाणी बाटली 40 ला दिली, 18000 रुपये झाला दंड, ग्राहक मंचाचा मल्टिप्लेक्सला दणका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बाहेरचे पिण्याचे आत आणू न देता दहा रुपयांची बाटली 40 रुपयांना विकून फसवणूक केल्या प्रकरणी आयनॉक्‍स चित्रपटगृह व कोका कोला कंपनीला ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला आहे. ग्राहकास नुकसान भरपाईपोटी पाच हजार रुपये, तक्रार खर्चापोटी तीन हजार रुपये, तसेच लीगल अँड सर्व्हिस शाखेत दहा हजार असे एकूण 18 हजार रुपये एक महिन्यात जमा करण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. 


हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठातील वकील अतुल हावळे पाटील, अॅड. योगेश बोबडे व अॅड. अशिष शिंदे हे दिनांक 5/03/2017 रोजी बाहुबली हा चित्रपट पाहण्यासाठी जवळ सलेल्या आयनाॅक्स सिनेमागृहात गेले होते चित्रपटाची तीन तिकीटे खरेदी केल्यानंतर तक्रारदार यांनी सोबत आणलेली पिण्याच्या पाण्याची बाटली घेवुन चित्रपटग्रहात प्रवेश केला त्यावेळेस प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाने त्यांना सुरक्षेच्या कारणासठी बाहेरून आणलेली पिण्याच्या पाण्याची बाटली चित्रपटग्रहात घेवून जाण्यापासुन मज्जाव केला. त्यावेळेस तक्रारदार यानी असे सागितले कि आपणास सुरक्षेच्या कारणाखाली पिण्याच्या पाण्याची बाटली चित्रपटगृहात घेवून जाण्यापासून रोखता येणार नाही पण त्यांचे काहीच एेकून घेतले नाही.नाईलाजाने त्यानां पिण्याची बाटली बाहेर ठेवावी लागली. 

 

मध्यातंरानंतर त्यांनी याना खूप तहान लागली होती. त्यामुळे तिघे पिण्याच्या पाण्याची बाटली खरेदी करण्यासाठी चित्रपटगृहात असलेल्या स्टाॅलवर गेले. त्या वेळेस INOX वाल्यानी co-co  Cola कंपनीची आसलेली kingly नावाची 500 ML ची पाण्याच्यान  500 ML बाटलीचे साठी 40 रुपये किमतीचे बिल दिले. चित्रपट संपल्यावर तक्रारदार यांनी INOX च्या व्यवस्थकाकडे तक्रार केली परंतु त्यानी त्याची कोणतीही दखल  घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार वकिलांनी मा. जिल्हा ग्राहक मंच औरंगाबाद या ठिकाणी आयनाॅक्स सिनेमा व कोको कोला कंपनी यांच्या विरोधात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच औरंगाबाद या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात केली. सदर तक्रारीवर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तीवाद व सुनावणी झाल्यानंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच औरंगाबाद यानी असा आदेश केला की INOX सिनेमाग्रह व कोको कोला कंपनीने यानी तक्रारदार याना रक्कम रुपये 5000 हजार दंड म्हणून देण्याचा आदेश केला व  तक्रारीचा खर्च म्हणून 3000 रूपये देण्याचा केला आदेश व कोको कोला कंपनीने रक्कम रुपये 10000 हजार हे लिगल एंड सर्व्हिसमध्ये जमा करण्याचा आदेश दिलाआहे.

बातम्या आणखी आहेत...