आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राज्य सरकारने साेमवारी २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात अाैरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशाेर राम यांना पुण्यात जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात अाली, तर त्यांच्या जागी ठाणे मनपाचे अतिरिक्त अायुक्त सुनील चव्हाण यांची बदली करण्यात अाली.
अाैरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी पवनीत काैर यांच्याकडे साेपवण्यात अाली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ. ए. एम. महाजन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी वाशीम येथे कार्यरत असलेले राहुल द्विवेदी येणार अाहेत. जालन्याचे जिल्हाधिकारी एस. अार. जाेंधळे यांची मुंबईत बदली झाली.
कुणाची कुठे झाली बदली ?
पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी तर वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बदली डहाणूच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आचल गोयल यांची रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चेन्ने यांच्याकडे परिवहन आयुक्त आणि निवडणूक आयोगाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. महिला आणि बालकल्याण आयुक्त डॉ. एस. एल. माळी यांची नांदेड महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे तर अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त, नागपूर माधवी खोडे-चावरे यांची महिला आणि बालकल्याण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती यांची महाव्यवस्थापक, खाण महामंडळ नागपूर पदी बदली झाली आहे. तर एमएमआरडीएचे डॉ. संजय यादव यांच्यावर अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा भार सोपवला आहे.बुलडाण्याचे जिल्हाधिकारी सीएल पुलकुंडवार यांची सहसंचालकीय व्यवस्थापक, एमएसआरडीसी पदी बदली करण्यात आली आहे तर खाण महामंडळ नागपूरच्या महाव्यवस्थापक निरुपमा डांगे या आत्ता बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी असतील पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. तसेच गणपत देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.