आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'देवनागरी\' नाव वापरून दूध विक्री, ट्रेड मार्क अॅक्टचा भंग केल्याने कोर्टाचा मनाई हुकूम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाचे दूध "देवगिरी महानंद" या नावाने औरंगाबाद शहर तसेच संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होते. नेमकी हीच बाब हेरून वाळूज येथील सुरेश कचरू भडाईत (संचालक, कृष्णा मिल्क) यांनी श्री साई अॅग्रो इंडस्ट्री (माहेगाव, जि. अहमदनगर) व राहुरी तालुका सहकारी दूध व्यावसायिक संघ राहुरी यांच्या संगनमताने औरंगाबाद दूध उत्पादक संघाच्या "देवगिरी महानंद" या नावाने विक्री होणाऱ्या दूध बॅगची नक्कल करून रंगसंगती इत्यादी तशीच ठेवून "देवनागरी सुनंदा" या नावाने दूध विक्री करत असल्याचे आढळले.

> यामुळे औरंगाबाद दूध उत्पादक संघाने सुरेश भडाईत व राहुरी तालुका दूध व्यावसायिक संघ यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालय औरंगाबाद येथे ट्रेड मार्क अॅक्ट, 1999 नुसार कायमस्वरूपी मनाई हुकूम व नुकसान भरपाईबाबत विजया लॉ ऑफिसचे अॅड. दत्तात्रय कात्नेश्वरकर यांच्या मार्फत दावा दाखल केला. याप्रकरणी प्रतिवादींना "देवनागरी" हे नाव त्यांच्या दूध उत्पादनासाठी वापरण्यास मनाई करणारा आदेश जिल्हा न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी पारित केला. याप्रकरणी औरंगाबाद दूध उत्पादक संघाच्या वतीने जिल्हा न्यायालयात अॅड. दत्तात्रय कात्नेश्वरकर यांनी बाजू मांडली तसेच त्यांना अॅड. प्रसाद टाकळकर यांनी साहाय्य केले. 

बातम्या आणखी आहेत...