आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद कचऱ्याचा प्रश्न विधान परिषदेत ‘पेटला’, शिवसेनेकडून समस्यांचा वापर दंगल पेटविण्यासाठी हाेत असल्याचा अाराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गेल्या अनेक महिन्यांपासून अाैरंगाबादकरांना भेडसावणारा कचऱ्याचा प्रश्न बुधवारी विधान परिषदेत उपस्थित झाला. कचऱ्याचे ढीग, रस्त्यांची दुरवस्था, भुयारी गटार योजनेचा बोजवारा आणि रखडलेली समांतर पाणीपुरवठा योजना या प्रश्नांवरून काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अामदारांनी औरंगाबाद महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला लक्ष्य केले. गेल्या अधिवेशनापासून हे प्रश्न मांडले जात असताना राज्य सरकारही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. अखेरीस, या प्रश्नांच्या सोडवणुकीची जबाबदारी राज्याच्या प्रधान सचिवांकडे सोपवणार असल्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली.

 

आशियातील सर्वात वेगवान वाढणारे शहर आणि जागतिक कीर्तीचे पर्यटन शहर असूनही औरंगाबाद शहरातील मूलभूत प्रश्न गंभीर झाल्याचा व महापालिकेचा नियोजनशून्य कारभार यास जबाबदार असल्याचा मुद्दा आमदार सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित आणि विद्या चव्हाण यांनी अल्पकालीन चर्चेत उपस्थित केला. शिवसेनेचे स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे हेच औरंगाबाद महापालिकेच्या गलथान कारभारास जबाबदार असल्याचा आरोप या अामदारांनी केला, तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे डंपिंग ग्राउंडसाठी जागा देत नसल्याचा जाहीर आरोप खैरे यांनी केल्याचे चव्हाण यांनी सभागृहाला सांगितले.  मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तातडीच्या उपाययोजनांसाठी औरंगाबाद महापालिकेला निधी दिला, मात्र त्याचादेखील कशा प्रकारे दुरुपयोग करण्यात आला हेही सांगून, या प्रश्नात अाता राज्य शासनानेच लक्ष घालावे, अशी मागणी केली.

 

कचऱ्यामुळे पर्यटक घटले : सतीश चव्हाण
कचऱ्याच्या प्रश्नामुळे औरंगाबादचा पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. गेल्या वर्षी औरंगाबादमध्ये १७ लाख पर्यटकांची संख्या यंदा ८ लाखांवर घसरली आहे. शहरात २० हजार टन कचरा पडून आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. १५१ दिवस झाले, अधिकारी शासनाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेला १०० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला नाही. तातडीच्या उपाययोजनांची ३१ मेची मुदत उलटून गेली, पण ते उपाय केले गेले नाहीत. दीर्घकालीन उपाय निविदांमध्ये अडकले आहेत. रॅम्के कंपनीला द्याव्या लागणाऱ्या ३४ कोटींच्या भरपाईच्या नुकसानीस जबाबदार कोण, याचा शोध घ्या.


पुढील स्‍लाइडवर वाचा, खासदार खैरेच महापालिका चालवतात...

 

बातम्या आणखी आहेत...