आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकअदालतीत आैरंगाबाद खंडपीठ देशामध्ये पहिले! भूसंपादनाची सर्वाधिक प्रकरणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- औरंगाबाद उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत एकाच दिवशी विक्रमी ११५८ प्रकरणे निकाली काढून शासनाची १० कोटींची बचत केली आहे. देशामधील इतर हायकोर्टांत राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोड झालेल्या प्रकरणांतील आैरंगाबाद खंडपीठातील संख्या सर्वाधिक आहे. अदालतीत १५०० भूसंपादनाची प्रकरणे आली होती. त्यापैकी ११३५ निकाली निघाली.


सध्या न्यायव्यवस्थेवर वाढलेला ताण लक्षात घेता जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी दर २ महिन्यांनी लोकअदालत घेतली जाते. आैरंगाबाद खंडपीठात तडजोडीसाठी ठेवलेल्या प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर देशपातळीवर यश प्राप्त झाले आहे. वर्षभरात खंडपीठात आयोजित लोकअदालतीत आतापर्यंत २४६५ एवढीउर्वरित. 

 

६ अब्ज २ कोटींची बचत
राज्यातील सर्व न्यायालयांसह एक उच्च न्यायालय व दोन खंडपीठांमध्ये १० लाख ४३ हजार १६ प्रकरणे होती. यातील ४१ हजार १९३ प्रकरणांमध्ये सुनावणी होऊन २ लाख ४१ हजार ३८८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. यातून शासनाच्या ६ अब्ज २ कोटी ४९ लाख २९३८४ रुपयांची बचत झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...