आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहिन्यांना इतकी छिद्रे की तेवढी जर एखाद्या माणसाला पडली असती तर तो मेलाच असता- नवे आयुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रशासनाने वारंवार आश्वासन देऊनही तीन दिवसांआड पाणी देणे शक्य झालेले नाही. आजही काही भागाला सहा दिवसांनंतर पाणी मिळते. या मुद्द्यावरून बुधवारच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांची तीच ओरड आणि तोच आक्रोश होता, परंतु या वेळी अपेक्षा होती नवीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडून. बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत....

 

'शहरात जी पाणी समस्या निर्माण झाली आहे, त्याबद्दल प्रशासकीय प्रमुख म्हणून मी माफी मागतो. मी जायकवाडीपासून योजनेची पाहणी केली. अभ्यासही केला, पण मुबलक पाणी उपलब्ध असतानाही आपण नागरिकांना समान पाणी का देऊ शकत नाही, याचे उत्तर मला सापडले नाही. शहराची गरज २१० एमएलडी इतकी आहे. शहरात १३५ पाणी येते. तरीही तीन दिवसांनी आपण पुरेसे पाणी का देऊ शकत नाही, यावर मी माझ्या टीमसोबत चर्चा करतोय. लाइनमनपर्यंत सर्वांशी बोलतोय. आपण सर्व जण मिळून प्रयत्न करूया. तूर्तास तातडीच्या काही उपाययोजना हाती घेऊन पाणी येण्याचे दिवस जवळ करण्याचा प्रयत्न करूया. समान पाणीवाटप न होणे ही नियोजनाचीच चूक आहे. कोठे गळती होते, हे पाहून ते थांबवण्यासाठी नियोजन करतोय. त्यासाठी प्रत्येक वॉर्डात शिबिरे लावण्याचे माझे नियोजन आहे. त्याचे नेतृत्व संबंधित वॉर्डाच्या नगरसेवकाने करावे. त्यात सर्वप्रथम उघड्या डोळ्याने दिसणारी गळती रोखणे, सार्वजनिक तसेच खासगी नळांना तोट्या लावणे आणि लोकांना सोबत घेत मोटारींचे प्रमाण कमी करणे.

 

वॉटर ऑडिट होईपर्यंत संप कोठे बांधायचे आहेत, कुठली दुरुस्ती करायची याचे नियोजन करू. ही योजना म्हणजे कॅन्सरग्रस्त व्यक्तीसारखी आहे. समोर जेवण दिसते, पण जेवता येत नाही. इतकी छिद्रे माणसाला असती तर माणूस केव्हाच मेला असता. ही योजना चालतेच कशी, असा प्रश्न मला पडतोय. ही सिस्टिम प्रॉब्लेमॅटिक झालीय. यातून मार्ग काढण्यासाठी तामिळनाडूतून काही तज्ज्ञांना बोलावू. त्यांच्याशी चर्चा करतोय. सर्व मिळून प्रयत्न करू. मार्ग काढू, एवढेच मी सांगू शकतो.'

बातम्या आणखी आहेत...