आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद - राज ठाकरेंचा नामंजूर केलेला हजेरीमाफीचा अर्ज कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - २००८ मधील दंगल प्रकरणात कन्नड कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नामंजूर केलेला हजेरीमाफीचा रद्द केलेला अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनीही मंगळवारी कायम केला. त्यामुळे राज ठाकरे यांना सुनावणीला हजर व्हावे लागणार आहे. या प्रकरणात पिशोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी. के. ठोंबरे यांनी फिर्याद दिली होती. दरम्यान, अर्जावरील सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी अर्ज मंजूर करण्यासाठी विरोध केला.

 

हजेरीमाफीचा अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवादही कोर्टात करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरुन हजेरीमाफी रद्दचा अर्ज कोर्टाने नामंजूर केला.

 

 

बातम्या आणखी आहेत...