आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद ग्रामीण पोलिस गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये प्रथम;गोंदिया दुसऱ्या क्रमांकावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मोठ्या शहरांना मागे टाकत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणण्यात यावर्षी प्रथम क्रमांक पटकावला. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीनुसार गोंदिया दुसऱ्या, जळगाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे गुन्हे कबुली सिद्ध करण्यातही ग्रामीण पोलिस चौथ्या क्रमांकावर आहेत. दरवर्षी गुन्हे अन्वेषण विभागाकडून राज्यातील विविध जिल्हे आणि शहरात नोंद झालेले गुन्हे आणि उघडकीस आणण्याचे प्रमाण याचा अभ्यास केला जातो. २०१७ ची आकडेवारी त्यांनी बुधवारी जाहीर केली. त्यात औरंगाबाद ग्रामीणचे गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रमाण ५४.५५ टक्के असल्याचे  सांगण्यात आले. त्या पाठोपाठ गोंदिया ४२.७४, जळगाव ४२.४८, जालना ४१.१९ व अकोला ३९.५७  टक्के आहेत.

बातम्या आणखी आहेत...