आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहराचा बुद्धिस्ट सर्किटमध्ये समावेश होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वेरूळ-अजिंठा लेणीची अतुल्य भारतमध्ये जाहिरात करण्यात येणार आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर औरंगाबादची ब्रँडिंग होईल. बुद्धिस्ट सर्किटमध्ये औरंगाबादचा समावेश करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

 

दिल्लीत मंगळवारी जपानच्या मंत्र्यांसह भारतीय पर्यटन क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वेरूळ आणि अजिंठ्याच्या प्रसिद्धीसाठी बैठक पार पडली. या वेळी जपानचे मंत्री के. के. सोने, नाकेमा वाकामोनो ताकायेशु तांगे, भारताच्या पर्यटन विभागाचे सहसचिव सुमन बिल्ला यांची उपस्थिती होती. या बैठकीत वेरूळ- अजिंठ्याच्या ब्रँडिंगसाठी सर्वच पातळ्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती चौधरी यांनी दिली आहे.

 

जाहिरातीमधून होणार ब्रँडिंग : अतुल्य भारतमध्ये वेरूळ, अजिंठ्याची जाहिरात केली जात नाही. मात्र, आता समावेश करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. झाल्याने प्रवेश प्रक्रियेस वेग आला आहे. २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून ३१ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. २९ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. ३० जून ते २ जुलैपर्यंत विहित नमुन्यातील हरकती शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थ्यांनी नोंदवायच्या आहेत. ३ जुलैला याचे निवारण केले जाईल. ५ जुलै रोजी सायं. ५ वाजता केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. ६ ते ९ जुलैदरम्यान केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश निश्चित करायचे आहे. १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांचा तपशील आणि पहिल्या फेरीचे कट ऑफ जाहीर होइल. पहिल्या यादीत ज्यांचे नाव येईल तसेच त्यांनी दिलेले कॉलेज व शाखेचे पर्याय मिळाल्यास प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. जर त्यांनी प्रवेश निश्चित केला नाही तर ते फेरीतून बाद होतील, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

 

बुद्धिस्ट संमेलनाचे आयोजन
चौधरी म्हणाले, बोधगया सारनाथ येथे दरवर्षी तीन ते पाच दिवसांचे आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संमेलन पार पडते. यात जगभरातून किमान तीन ते पाच लाख लोक सहभागी होतात. त्यामुळे या संमेलनाचा एक दिवस औरंगाबादमध्ये घेण्याविषयी चर्चा झाली. यास मान्यता मिळाली असून शक्य झाल्यास या वर्षी ऑगस्टमध्ये अथवा पुढच्या वर्षी हे संमेलन औरंगाबादमध्ये घेण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...