आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद- नोकरीसाठी 35 लाख भरले कॉपी करु द्या, नाहीतर कॉलेजच्या इमारतीवरुन आत्महत्या करतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एमआयटी नर्सिंग काॅलेजमध्ये झालेल्या विद्यार्थी आत्महत्या प्रकरण शांत 
होत नाही तोच आता नोकरीसाठी ३५ लाख रुपये भरले आहेत. मला ही परीक्षा पास  होणे आवश्यक आहे. कॉपी करु द्या,पाहून लिहू द्या अन्यथा कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करेल. अशी धमकी देत भावी गुरुजी पळत सुटला. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी समजावत विद्यार्थ्यास परत वर्गात बसवले आणि शांत केले. 


कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्याने दिलेल्या या धमकीमुळे एकच गोंधळ नवखंडा कॉलेज परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणी शनिवारी घडला. यासंदर्भातील माहिती महाविद्यालय प्रशासनाने विद्यापीठाच्या परीक्षाविभाग आणि पोलीसांना कळवला आहे.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीएड अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. १० ते २७ एप्रिल पर्यंत या परीक्षा चालणार आहेत. आज सकाळी १० ते ११:३० यावेळेत बीएड प्रथम वर्षाचा विज्ञान विषयाचा understanding discipline and pedagogy of schoolsubject science पेपर होता. पेपर सुरु असतांना ११ आणि ११ वाजून १० मिनिट झाले होते. यावेळेस डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन नवखंडा या परीक्षा केंद्रावर  एम थ्री हॉलमध्ये बीएड प्रथम वर्षाचा विद्यार्थी कॉपी करतांना आढळून आला. कॉपीसह विद्यार्थ्यास पर्यवेक्षकांनी पकडले. त्यानंतर खात्रीकरण्यासाठी उत्तरपत्रिका जमा केलयावर सदरील विद्यार्थ्याने धमकी दिली की 

माझा पेपर परत देण्यात यावा नसता मी आत्महत्या करेन. नोकरीसाठी ३५  रुपये भरले आहेत.

 

त्यानंतर महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्यासाठी संबंधीत विद्यार्थी वर्गाबाहेर पळत सुटला. यामुळे घाबरलेल्या महिला कर्मचारी आणि पर्यवेक्षकही विद्यार्थ्यामागे त्याला वाचवण्याठी गेले. विद्यार्थी दुसऱ्या मजल्यावर पोहचला त्याला समजावून  सांगत तुझा पेपर परत देतो तो खाली ये वर्गात बस असे सांगून त्याला शांत करण्यात आले. त्याचा पेपर परत दिला. कॉपी ताब्यात घेवून त्याला उर्वरित पेपर लिहू दिला. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण हॉलमध्ये भितीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व प्रकाराची माहिती विद्यापीठ स्कॉड कॉलेजमध्ये येतात त्यांना देण्यात आली. तसेच खबरदारी म्हणून विद्यार्थ्याने दिलेल्या धमकी संदर्भातील तक्रार अर्जही पोलीसांना देण्यात आला आहे. परीक्षा विभागासही माहिती कळवल्याचे महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.मजहर फारुकी यांनी दिली.

 

पेपर नियमित होणार
गुणवत्ता वाढीसाठी काॅपीमुक्त अभियान राबविण्यात येते. एक परीक्षा केंद्र आणि प्राचार्य म्हणून महाविद्यालयावरही सुरक्षित परीक्षेची जबाबदारी असते.परंतु शहरात नुकतीच एकविद्यार्थ्याची कॉपी पकडली म्हणून आत्महत्याझाल्याचा प्रकार घडला. आता तर कुणीही येवून दबाव निर्माण करतो आहे. आजमहाविद्यालयात कॉपी पकडली म्हणून बीएडच्या विद्यार्थ्याने आत्महत्येची
धमकी दिली. खबरदारी म्हणून आम्ही पोलीसांना आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागास लेखी माहिती दिली आहे. उद्यापासून जसे नियमित पेपर घेतले जातात तसेच होतील- डॉ.मजहर फारुकी प्राचार्य
 

परीक्षा घ्यायच्या की नाही ?
पेपर सुरु होण्यापूर्वी आणि वर्गाच्या येत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी केली जाते. सकाळी १० ते ११:३० असा दीड तासांचा पेपर होता. आम्ही पहिली तपासणी केल्यावर दुसऱ्या इमरतीतील हॉलची तपासणी करण्यासाठी गेलो असता. वर्ग क्र ३ मध्ये पाहणी दरम्यान सदरील विद्यार्थी कॉपी पाहून लिहितांना आढळून आला. तात्काळ त्याचा पेपर घेवून तो लिहित असलेले आणि उत्तपत्रिकेतील मचकूर पाहिला असता त्यात साम्य आढळून आले. म्हणून त्याचा 
पेपर घेण्यात आला. त्यावर त्या विद्यार्थ्याने आरडाओरड सुरु केली. आत्महत्येची धमकी दिली. नोकरीसाठी पैसे भरलेत लिहू द्या असे म्हणत पळत सुटला महिला कर्मचाऱ्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराची आम्ही माहिती विद्यापीठाला दिली आहे. अशा प्रकारांमुळे आता  परीक्षा कशा घ्यायच्या असा प्रश्न निर्माण होतो आहे- डॉ. विद्या प्रधान, केंद्र प्रमुख आणि डॉ.वी.रा.मोरे सहकेंद्रप्रमुख

बातम्या आणखी आहेत...