आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळ्याच्या विरोधातील 'ती' याचिका निकाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळा उभारणीला विरोध करणारी याचिका खंडपीठाने निकाली काढली. राज्य शासनाने ठरवलेल्या धोरणाप्रमाणे प्रस्तावित पुतळ्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा असे निरीक्षण खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि के. के. सोनवणे यांनी नोंदवले आहे. 

शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय विद्यापीठातील विविध प्राधिकरणांनी घेतला आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी विद्यापीठ निधीतून ४० लाख रुपये खर्च करून पुतळा बसवण्यासंदर्भात भूमिका घेतली आहे. मात्र काही संघटनांनी विद्यापीठ निधीतून पुतळा उभारण्यास तीव्र विरोध केला होता. तर मराठा संघटनांनी पुतळा उभारण्याची मागणी कुलगुरूंकडे केली होती. विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास विरोध करणारी याचिका सचिन रतन शिंदे यांनी दाखल केली होती. ५ मार्च रोजी याचिका निकाली काढण्यात आली. 

 

बातम्या आणखी आहेत...