आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद-लातूर-बीडची अाजची मतमाेजणी स्थगिती; अायाेगाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-  स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहापैकी पाच मतदारसंघांत गुरुवारी मतमोजणी होत आहे.  उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघातील मतमोजणी ऐनवेळी स्थगित करण्यात आली. बीडमधील अपात्र ११ नगरसेवकांना मतदानाची मुभा देतानाच त्यांची मते निकालावर परिणामकारक ठरत असतील तर या निवडणुकीचा निकाल जाहीर करू नये. हा निकाल संबंधित याचिकेच्या अंतिम निकालास अधीन राहील, असे अादेश अाैरंगाबाद खंडपीठाने दिले हाेते. त्याविराेधात संबंधित नगरसेवकांनी पुनर्विलाेकन याचिका दाखल केली अाहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे न्यायालयाला निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नसल्याचा युक्तिवाद त्यात करण्यात अाला अाहे. त्यावर गुरुवारी सुनावणी हाेणार अाहे. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील मतमाेजणी स्थगित ठेवण्यात अाल्याची माहिती अाहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीपुरस्कृत अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...