आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; सुतगिरणी चाैकात मध्यरात्री अपघात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद- दुचाकीवरून घरी जात असताना अज्ञात अॅटाेरिक्षाने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास गारखेडा परिसरातील सुतगिरणी चाैकात घडला. राजू विश्वनाथ पगारे (वय अंदाजे २५ ते ३०, रा. विजयनगर, अाैरंगाबाद) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असल्याची माहिती जवाहरनगर पाेलिसांनी दिली. 

 

राजू पगारे हे लाल रंगाच्या स्कूटीवरून (एमएच २० एअार १३२६) जात असताना भरधाव रिक्षाने त्यांना जाेराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. काही नागरिकांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घाेषित केले. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत नेण्यात अाला. 

बातम्या आणखी आहेत...