आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; खुनाचा संशय; वैजापूर येथील इंदिरानगर भागातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- इंदिरानगर भागातील गणेश अशोक शिंदे (२७) या तरुणाने महारुकच्या झाडाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. मात्र ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला. या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी करत त्यांनी पोलिस ठाण्यात केली. 


नागपूर -मुंबई महामार्गावर इंदिरानगर परिसराच्या मागील भागात गट क्रमांक १९२ मध्ये महारुकच्या झाडाला एका तरुणाचे प्रेत लटकल्याचे वृद्ध महिलेने पाहिले. याबाबत तिने तिचा मुलगा व इतरांना सांगितल्यानंतर त्या ठिकाणी मोठा जमाव झाला. महारुकचे झाड नाजूक असल्याने या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करता येईल का, असा प्रश्न उपस्थित करुन ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. 


गणेश याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आला असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्यात येईल, अशी माहिती एपीआय रामहरी जाधव यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...