आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अजिंठा अर्बन'च्या उस्मानपुरा शाखेच्या व्यवस्थापकाची गळफास घेऊन आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या उस्मानपुरा शाखेचे व्यवस्थापक धर्मेंद्र दिगंबर पुराणिक (४३, रा. समर्थनगर) यांनी गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी, मुलगा व मुलीसह पुराणिक सहा महिन्यांपूर्वीच समर्थनगर येथे राहण्यासाठी आले होते. त्यांनी सकाळी नववीतील मुलाला शाळेत सोडले. पत्नी ड्रायव्हिंग क्लाससाठी गेली होती. सहावीत शिकणारी मुलगी आजारी असल्याने आतल्या खोलीत झोपलेली होती. या दरम्यान धर्मेंद्र यांनी हॉलमध्ये गळफास घेतला. 


पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी धर्मेंद्र यांना खाली उतरवून घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सायंकाळी पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. क्रांती चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरात कुठलीही सुसाइड नोट आढळली नसल्याचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...