आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद दंगल: MIM आमदार इम्तियाज जलील यांचे खासदार खैरेंना खुलं पत्र, वाचा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मागील आठवड्यात औरंगाबाद शहरात दंगल भडकली. यानंतर आता यावरून राजकारण सुरू झाले आहे. या दंगलीमागे काही राजकीय पक्षाचा हात असल्याचे समोर आले आहे. मात्र, औरंगाबाद शहरातील एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे यांना एक खुले पत्र लिहले आहे. तसेच औरंगाबाद दंगलीनंतर शहरात शांतता प्रस्थापित करण्याऐवजी आपण (चंद्रकांत खैरे) धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहात व शहराचा एक खासदार या नात्याने तुम्हाला हे शोभत नाही, असा आरोप जलील यांनी पत्रात केला आहे.

 

आमदार इम्तियाज जलील यांचे खा. खैरे यांना लिहलेल्या खुल्या पत्रातील मजकूर (स्वैर अनुवाद) वाचा....

 

खासदार खैरेसाहेब,

 

आपण अलीकडील तणावग्रस्त वातावरणात आपल्या पत्रकार परिषदांमध्ये, वृत्तवाहिनींवरील  मुलाखतींमध्ये, तसेच जाहीर सभांमध्ये आणि पोलीस वर्गासमोर केलेली वक्तव्यं मी व औरंगाबाद शहराच्या सर्वच नागरिकांनी ऐकली आहेत. आपण या सर्व वक्तव्यांत किमान शंभर वेऴा म्हणालात की, "मी सर्व हिंदूंचे रक्षण करणार. मी हिंदूंचा नेता आहे. मी हिंदूंचा पहिला आमदार होतो, मी हिंदूंचा खासदार आहे."

 

क्षमस्व आहे खा. खैरे साहेब आपलं हे मत वाचून व ऐकून एक संवेदनशील मानवतावादी औरंगाबादी नागरिक या नात्याने मला खूप वेदना झाल्या आहेत आणि औरंगाबादच्या लाखों जागरूक नागरिकांनाही हे मत बोचलं आहे. आपले हे वक्तव्य म्हणजे काही गुन्हा नसला तरी आपल्या सकुंचित मानसिकतेचे विखारी विचारांचे उत्तम उदाहरण आहे.

 

खा. खैरेसाहेब, आपण चूकीचं बोलता आहात. आपण केवऴ हिंदूंचे नव्हे तर माझ्यासह या सुंदर शहरातील सर्व मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, शीख, जैन, पारशी आदि सर्वांचे खासदार आहात. आम्हा सर्वांचे तुम्ही खासदार आहात. खा. खैरेजी, देशातील 130 कोटी नागरिकांपैकी फक्त 543 नागरिकांना खासदार होण्याची संधी मिऴते व ती संधी वारंवार मिऴालेले भाग्यवान आपण आहात. तुम्ही या शहराचे वरिष्ठ नेते आहात. परंतु जेव्हा केव्हा असामाजिक असे काही घडते तेव्हा तुम्ही स्वतः एका विशिष्ट जाती धर्माचा नेता म्हणून मिरवू लागता. तुम्हाला याचे देखील भान राहत नाही की तुम्ही या शहरातील प्रत्येक नागरिकाचे नेते आहात. या शहराप्रती व इथल्या सर्व नागरिकांप्रती आपली जबाबदारी आहे. खासदार व लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांची काऴजी घेणे व संरक्षण करणे हे तुमचे काम आहे, कारण तुम्ही आम्हा सर्वांचे नेते आहात. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीत ओढून ताणून तुमचा धर्म, तुमची जात घेऊन येता तेव्हा खूप वेदना होतात. तुम्हाला असं करण्याची काहीच गरज नाही.

 

चला लोकप्रतिनिधी म्हणून आपण दोघे पुढाकार घेऊन तुमच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शांती मार्च काढूया. आपल्या या लाडक्या शहरात पुन्हा दंगल होणार नाही असं वातावरण तयार करूया. शहरातील आम जनतेसाठी कचरामुक्ती, पाणी, रस्ते, शिक्षण व आरोग्य ही अधिक महत्वाची कामं आपण खासदार व आमदार म्हणून करावी असं औरंबादकरांना वाटते आहे. ते काम तुमच्यासोबत करायला मी तयार आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पहातो आहे खा. खैरेसाहेब!

 

शहराचा एक नागरिक व आमदार
इम्तियाज़ ज़लील

 

बातम्या आणखी आहेत...