आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारसनगर परिसरात दोन गटांत हाणामारी; २३ जणांविरोधात गुन्हा, पाच आरोपींना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सारसनगर परिसरातील चिपाडे मळा येथे दोन गटात हाणामारी झाली. यावेळी जमावाने वाहनांची तसेच पथदिव्यांची तोडफोड केली. याप्रकरणी दोन्ही गटाने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार २३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक करून चार मोटारसायकली     देखील जप्त केल्या आहेत. 


टिंग्या उर्फ गणेश म्हसूदेव पोटे, संदिप शरद शिंदे, अविनाश विश्वास जायभाय, विजय चंद्रभान फुलारी, नागेश भिकाजीराव पारखे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चार मोटारसायकली देखील जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी सुरेश नारायण आंबेकर यांनी दुसऱ्या गटाच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आपण रात्री नऊ वाजता कुटूंबियांसह घराबाहेर बसलो होतो. यावेळी ऋषीकेश रासकर, शुभम धूमाळ व त्यांच्या अन्य साथीदारांनी घरासमोर असणाऱ्या पथदिव्यांची तोडफोड करत दिवे बंद पाडले. अांबेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या कुटूंबावर दगडफेकही केली. त्यात आंबेकर यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर शिवप्रसाद शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण रात्री घरी जात असताना मुकेश बाबासाहेब आंबेकर व त्याच्या साथीदारांनी आपल्याला अडवले व दुचाकीची चावी काढून घेतली. शिवीगाळ व मारहाण केली. रस्त्यावरून जात असलेल्या ऋषीकेश रासकर याने का मारत आहात, अशी विचारणा केली असता रासकर याला मारकाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या परस्परविरोधी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...