आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या इमारतीचे भूमिपूजन मी केले, त्याचेच उद्घाटन करतोय : मुख्यमंत्री फडणवीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ज्या मुख्यमंत्र्याने भूमिपूजन केले त्याच्याच कार्यकाळात इमारतीचे उद‌्घाटन होते आहे. किती वेगाने कामे होताहेत पाहा, हा महत्त्वाचा बदल आपल्याला पाहावयास मिळतो आहे. गेल्या तीस वर्षांत जेवढी कामे झाली नाहीत ती आमच्या सरकारने तीन वर्षांत केली, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला. शनिवारी औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते.

 

पुढे बोलताना ते म्हणाले २४ तास सेवेची अपेक्षा पोलिस दलाकडून केली जाते. त्यांना योग्य सोयी-सुविधा दिल्यास ते समाजाला उत्तम सेवा देऊ शकतील. त्यामुळे एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयासारखी ही इमारत उभी केली. विशेष म्हणजे पोलिसांचे काम लक्षात घेऊन त्यात सुविधा करण्यात आल्या आहेत. या कार्यालयात असलेली कंट्रोल रूम संपूर्ण शहरावर लक्ष ठेवू शकते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशनमुळेच पोलिसांचे बळ वाढू शकते, त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन होऊ शकते, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गृहराज्यमंत्री याबाबत एकमत झाले आहे. बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस रामअचल राजभर म्हणाले, जो कुणी नेता अाघाडीमुळे नाराज होऊन इतर पक्षांत प्रवेशाची खटपट करेल, त्याला कुठेही स्वीकारले जाणार नाही. असे अधिकृतरीत्या ठरवण्यात आले आहे. त्यावर सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले, समविचारी पक्ष एका व्यासपीठावर एकजूट झाले आहेत. कोणताही नेता व पदाधिकाऱ्याचा दलबदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहार आणि झारखंडमध्येही आम्ही प्रादेशिक पक्षांसोबत हे सूत्र राबवणार आहाेत.

 

काँग्रेसने झारखंड मुक्ती मोर्चा व झारखंड विकास मोर्चाशीही एकमत राखले आहे. राजदचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी म्हणाले, कोणत्याही पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्याला तोडले जाणार नाही, याची आघाडीतील पक्षांना काळजी घ्यावी लागेल. आमचा पक्षही याच फॉर्म्युल्यावर काम करत आहे. काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, पक्षविरोधी कारवाया कोणत्याही पक्षात मान्य नसतील. जी काही अाघाडी होईल त्यात समविचारानेच काम केले जाईल. राजकीय पक्ष एकमताने एकत्र येतील तर कुणी एकमेकांविरुद्ध कारवाया करणार नाहीत, हे स्पष्टच आहे. यात कोणत्याही प्रकारची अौपचारिक सहमती किंवा समझोत्याची गरज नाही. झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी म्हणाले, झारखंडमध्ये सर्व प्रादेशिक पक्षांत  समझोता झाला आहे. सर्व एकत्रितपणे आपला उमेदवार उभा करतील. अाघाडी मोडून कुणी दलबदल करणारे असेल तर त्याला घेतले जाणार नाही. झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन म्हणाले, लाेकसभा निवडणुकीत आम्ही एकत्रितपणे लढू. त्यावर चर्चा झाली आहे.  


या करारातून एक बाब स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे हे पक्ष आघाडीतील अडथळे व आव्हानांना गांभीर्याने घेत आहेत. अशीही एक रणनीती आहे की, बंडखोरांना अाघाडीचा दरवाजा बंद व्हावा आणि त्यांच्यापुढे फक्त भाजपचाच पर्याय उरावा. यामुळे आपल्याला फायदा होईल, असे भाजपला वाटेल. तथापि, यामुळे भाजपमध्येच कलहाची बीजे पेरली जातील.  दुसरीकडे, आधीच्या निवडणुकीआधी सपा, बसप किंवा काँग्रेसमधून आलेले भाजपचे सध्याचे खासदार आता पुन्हा आपल्या जुन्या पक्षांत परतण्यासाठी संपर्क स्थापन करत आहेत. त्यांना आशा आहे की, आपण भाजपमधून सपा किंवा बसपत परतणार असल्याने आपल्यावर हा नवा फाॅर्म्युला लागू राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...