आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षमता 6 ची, बसले 5 जण, तरी वजन वाढले; मुख्‍यमंत्र्यांच्‍या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकहून अाैरंगाबादसाठी निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे १५० फुटांवरून इमर्जन्सी लँडिंग झाली. २ बॅगा आणि मुख्यमंत्र्यांचे स्वयंपाकी सतीश किनेकर यांना खाली उतरवून हेलिकॉप्टर पुन्हा झेपावले. ६ प्रवासी क्षमतेच्या हेलिकॉप्टरमध्ये ५ जण बसले होते. सीएमओने इंधनामुळे हेलिकॉप्टर उतरवल्याचा दावा केला. मात्र, सकाळीच अडीच बॅरल इंधन भरल्याचा दावा एका भाजप नेत्याने केला. 

 

 या वर्षातील घटना 
> १२ मे, गडचिरोली येथे मुख्यमंत्र्यांसाठी येणारे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे काेसळले हाेते.
>  २५ मे, निलंगा हेलिकॉप्टर विजेच्या तारांना अडखळून थेट खाली कोसळले होते. 
>  ७ जुलै, अलिबाग मुख्यमंत्री चाॅपरमध्ये बसण्याअाधीच पायलटने इंजिन सुरू केले. हेलिकॉप्टरच्या टेल रोटरने जखमी होण्यापासून मुख्यमंत्री थोडक्यात बचावले.

 

क्षमता 6 ची, बसले 5 जण, तरी वजन वाढले; मुख्‍यमंत्र्यांच्‍या  हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

मतेपेक्षा जास्त वजन झाल्याने नाशिकहून शनिवारी अाैरंगाबादसाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर सुमारे १५० फूट उंचावरून तातडीने खाली उतरवण्यात आले. २ बॅगा व मुख्यमंत्र्यांचा स्वयंपाकी सतीश किनेकर यांना खाली उतरवून मुख्यमंत्री पुन्हा झेपावले. ६ प्रवासी क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये पाचच जण बसले होते. 


मुख्यमंत्री कार्यालयाने इंधनाच्या मुद्द्यावरून हेलिकॉप्टर उतरवल्याचा दावा केला. मात्र, या हेलिकॉप्टरमध्ये  सकाळीच अडीच बॅरल इंधन भरल्याचा दावा एका भाजप नेत्याने वैमानिकाशी केलेल्या चर्चेच्या हवाल्याने केला आहे.   सारंगखेडा येथील कार्यक्रम अाटाेपून मुख्यमंत्री शुक्रवारी मध्यरात्री नाशिकला मुक्कामी अाले हाेते. शनिवारी अाैरंगाबादेत कार्यक्रम असल्यानेे सकाळी पावणेदहा वाजता पोलिस कवायत मैदानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे सचिव व स्वयंपाकी अशा चौघांसह हेलिकॉप्टरने उड्डाण केले. राजशिष्टाचाराचा भाग म्हणून उपस्थित असलेले उच्चपदस्थ अधिकारी रवाना हाेण्याची चिन्हे असताना जेमतेम १०० ते १५० फूट उंचीवर परत आले. 

 

वैमानिकाच्या सूचनेवरून हेलिकॉप्टर उतरले 

पोलिस कवायत मैदानावर अधिक उंच झाडे असल्यानेच उड्डाण करताना त्यापेक्षा अधिक उंचीवर जाणे आवश्यक होते. त्यासाठी उड्डाण करतानाच हेलिकॉप्टरचे तापमान जास्त वाढले. त्यातून वजन कमी करण्याचा निर्णय वैमानिकाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.  पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी घटनेची माहिती गृह सचिवांना दिल्याचे समजते.  याप्रकरणी  तांत्रिक बाबींची कल्पना नसून वैमानिक किंवा संबंधित जबाबदारच सांगतील, असे प्रशासनाने म्हटले आहे. 

 

हवेच्या दाबाची शक्यता  
हेलिकॉप्टरची क्षमता ५-६ जणांची आहे. अाम्ही ४ जणच होतो. तरीही हे कसे घडले. हवेचा दाब किंवा वेग अधिक होता की काय ? तांत्रिक बाबी मला माहीत नाहीत. एका व्यक्तीसह माझी व मुख्यमंत्र्यांची बॅग  काढल्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले.     
- गिरीश महाजन, मंत्री, वैद्यकीय शिक्षण  

 

तापमानाचाही परिणाम  
हा प्रकार अतितातडीच्या लँडिंगचा नव्हता.  मैदानावरील झाडांपेक्षा अधिक उंचीवर हेलिकॉप्टर नेताना तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. यामुळेच वैमानिकाने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला असावा.  
- विक्रांत चांदवडकर,  साई एव्हिएशन

 

पुढील स्लाइडवर वाचा... लातूरमध्ये कोसळले होते मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर... मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी आज अकोल्यात गृहपाठ...

बातम्या आणखी आहेत...