आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...त्‍या सिनेट सदस्‍या विरोधात कुलसचिवांकडे तक्रार; सहाय्यक कुलसचिव महिलेला शिवीगाळ प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सहाय्यक कुलसचिव महिलेला शिविगाळ केल्‍या प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील सिनेट सदस्‍या विरोधात कुलसचीव डॉ. साधना पांडे यांच्‍याकडे तक्रार करण्‍यात आल्‍याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. शनिवारी सहाय्यक कुलसचिवांना शिवागाळ झाली होती.


विद्यापीठाच्या पीएच़डी विभागात हेमलता ठाकरे या सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी त्या कार्यालयीन कर्तव्य बजावत असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सिनेट सदस्य संजय काळबांडे पीएचडी विभागात आले होते. कार्यालयात गर्दी असल्याने त्यांनी काळबांडे यांना थांबण्यास सांगितले. त्यानंतर मात्र दोघांमध्ये शाब्दिक चमकम झाली. प्रकरण पाहता-पाहता कार्यालयीन साहित्य उचलून मारण्यापर्यंत पोहचले. सबंधीत प्रकार पाहून कर्मचा-यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. सिनेट सदस्याच्या अशा वर्तनानंतर ठाकरे यांनी तत्काळ कुलसचिव डॉ. साधना पांडे यांची भेट घेऊन तोंडी तक्रार दिली. डॉ. पांडे यांनी यासंदर्भात कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ठाकरे यांनी नरमाईची भूमिका घेतली. दरम्यान, पीएचडी विभागात घडलेला संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाल्याचे समजते. सीसीटिव्ही कॅमे-याची तपासणी केल्यानंतर प्रशासन कारवाईच्या दृष्टीने पाऊले उचलणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर दुसरीकडे काळबांडे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

बातम्या आणखी आहेत...