आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिका-यांच्‍या आदेशानंतरही तालुका लोकशाही दिनात तक्रारींचा निपटारा होईना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनात तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे तालुका स्तरावरच्या लोकशाही दिनात त्या सुटल्या पाहिजेत, असे आदेश जिल्हाधिकारी एन.के. राम यांनी मे २१०७ मध्ये दिले होते. मात्र, तहसीलदारांच्या पातळीवर तक्रारींचा निपटारा होणार नाही, अशी बहुतांश लोकांची खात्री असून त्यांना यापूर्वी तसे अनुभवही आल्यामुळे तालुक्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडेच येत आहेत. 


जिल्हाधिकारी कार्यालयातीलही ६५ तक्रारी प्रलंबित : जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनाच्या वर्षभरात ६५ तक्रारी प्रलंबित आहेत.यामध्ये सर्वाधिक महसूल विभागाच्या ५० तक्रारी प्रलंबित आहेत. लोकशाही दिनात जानेवारीमध्ये ४० तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ३७ निकाली निघाल्या  आहेत. तर फेब्रुवारीमध्ये आचारसंहितेमुळे लोकशाही दिन झाला नाही. मार्चमध्ये ६६ पेकी ५६ एप्रिल ४८ पैकी  ४२, मे २८ पैकी २८ तक्रारी निकाली निघाल्या आहेत. जून ८१ पैकी ७४ तक्रारी,  जुलै १०४ पैकी ८४, ऑगस्ट ४० पैकी ३९ सप्टेंबर २९ पैकी १७ ऑक्टोबर ४ पैकी ०३ तक्रारी निकाल्या निघाल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये ५२ पैकी २० तक्रारी निकाली निघाल्या आहेत.

सुटतच नाहीत प्रश्न
चार महिन्यांत सोयगाव, सिल्लोडला तालुक्यातील दहा तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या. आमच्याकडे तक्रार आलीच नाही तर आम्ही काय करणार, असा सवाल सिल्लोडचे तहसीलदार संतोष गोरड, सोयगावच्या तहसीलदार छाया थोरात यांनी केला.  

 

तक्रारी का नाही याचा खुलासा
सिल्लोड, सोयगाव तालुक्यात प्रत्यक्षात लोकशाही दिन घेतला जातो का याचा खुलासा तसेच इतिवृत्त मागवले जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले.

 

अधिकाऱ्यांवर कारवाई करा
तालुका पातळीवर अधिकारी गंभीर नसतात. त्यामुळेच सर्वसामान्य लोक जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनात येतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांवर कारवाई केली तरच लोकांना फायदा होईल. 
सुभाष लोमटे, सामाजिक कार्यकर्ते

 

तक्रारी सुटल्या पाहिजेत
तालुका पातळीवर तक्रारींचा निपटारा का होत नाही? लोक थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे का येतात, याचा आढावा घेऊन संबंधितांना पुन्हा स्पष्ट आदेश दिले जातील. 
एन.के.राम, जिल्हाधिकारी

 

बातम्या आणखी आहेत...