आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटे पैसे परत मागताच महिला कंडक्टरने कानशिलात लगावली, पोलिसांत गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- औरंगाबाद ते रांजणगाव शेणपुंजी असा शहर बसने प्रवास करणाऱ्या शेख चाँद शेख हमीद (४४, रा. रांजणगाव शेणपुंजी) यांनी महिला कंडक्टरकडे उर्वरित सुटे पैसे परत मागताच त्यांच्याशी वाद घालत थेट कानशिलात लगावल्याची घटना बुधवारी वाळूज एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी दिव्यांग शेख यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिला वाहक व्ही. एस. पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दिव्यांग शेख हे औरंगपुरा येथून शहर बसने रांजणगावच्या दिशेने निघाले होते. महिला कंडक्टर व्ही. एस. पाटील यांनी शेख यांचे तिकिटासाठी १० रुपये घेत उर्वरित ४ रुपये नंतर देते, असे सांगितले. रांजणगाव नजीक येत असल्यामुळे तसेच अस्थिव्यंगामुळे उतरण्यास वेळ लागणार असल्याने पंढरपूर नजीक येताच शेख यांनी पाटील यांच्याकडे ४ रुपये पुन्हा परत मागितले. यावर संतप्त झालेल्या पाटील यांनी शेख यांच्याकडे अपंगत्वाचा पुरावा (ओळखपत्र) मागितला. शेख यांनी जवळील ओळखपत्र दाखवले. मात्र, रागावलेल्या पाटील यांनी वाद घालत शेख यांच्या गालात चापट मारली. शेख यांनी वाळूज एमआयडीसी ठाण्यात कंडक्टर पाटील यांच्याविरोधात तक्रार दिली. उपनिरीक्षक आरती जाधव तपास करत आहेत. 


सुट्या पैशास टाळाटाळ 
वाहकांकडून नेहमीच सुटे पैसे परत देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यातच महिला वाहक पैसे कधीच स्वत:हून देत नाहीत. दोन-चार रुपये असल्यामुळे महिलांशी वाद नको म्हणून अनेक जण पैसे परत न मागताच निघून जातात. अनेकदा वादही होत असल्याचे अनेक प्रवासी विद्यार्थ्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...