आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड -हैद्राबाद हायवेवर आॅटो रिक्षा आणि टेम्पोची धडक, नवदांपत्याच्या जागीच मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- बिलोली तालक्यातील कासराळी गावाजवळ हैद्राबाद नांदेड हायवेवर सोमवारी सकाळी टेम्पो आणि आॅटो रिक्षाच्या धडकेत नवदांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जखमी झाले असून त्यांना नांदेड येथे उचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार शिवलिंग कुलके (24 उदगीर, आणि कोमल यशवंतकर (20, नांदेड) यांचा 19 एप्रिल रोजी विवाह झाला होता. त्यानंतर ते आज देवदर्शनासाठी आपल्या कुटुंबियांसोबत निघाले होते. सकाळी कासराळी गावाजवळ टेम्पो त्यांच्या आॅटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात शिवलिंग आणि कोमलचा जागीच मृत्यू झाला तर शिवराज मंटाळकर (30), कृष्णा मंटाळकर (16), सविता बेल्लूरकर (35) हे जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 

 

पुढील स्लाईडवर पहा भीषण अपघाताचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...