आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना नेते कृष्णा पाटील डाेणगावकर यांच्याकडे आढळली दाेन जिवंत काडतुसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -  जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकरांचे पती तथा शिवसेनेचे नेते कृष्णा पाटील डोणगावकर हे मंगळवारी मुंबईला जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळावर पोहोचले. गेटवर मेटल डिटेक्टरने संकेत दिल्यामुळे डोणगावकरांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या बॅगेत चक्क दोन जिवंत काडतुसे आढळली. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी परिचय दिल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी शस्त्र परवाना मागितला. परवाना सोबत नसल्याने कृष्णा डोणगावकर यांना थांबावे लागले, तर देवयानी या मुंबईला रवाना झाल्या.
बातम्या आणखी आहेत...