आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​डीसीपी राहुल श्रीरामे बलात्कार प्रकरण : पुरावे घेऊन येते म्हणून गेलेली पीडित तरूणी परतलीच नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार देणारी २२ वर्षाची पिडीता आठ दिवस होवून गेले तरी जून पोलिसांना सापडलेली नाही. व्हॉटस्अॅपवर तक्रार नोंदवल्यानंतर २२ जून रोजी पोलिसांनी तिला बोलावून घेतले.

 

सहाय्यक आयुक्त अनिता जमादार, महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड रेणुका घुले, किरण शर्मा, विधी अधिकारी अॅड .आर. टी. अन्सारी, निरीक्षक किरण पाटील यांच्या समक्ष तिने फिर्यादीवर सही केली. मात्र जवाब नोंदवण्यास तिला सांगितले असता घडलेला घटना मी लिहून ठेवली आहे. या शिवाय माझ्याकडे पुरावे आहेत ते मी उद्या आणून देते असे सांगून ती २२ जून रोजी निघून गेली. ती परत आलीच नाही. पोलिसांना तिचे कुटुंबही अजून सापडलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...