आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JALNA: पारध येथील विहिरीत सापडला माय-लेकीचा मृतदेह; आत्महत्या केल्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - भोकरदन तालुक्यातील पारध येथे रविवारी एका विहिरीत एका आई आणि तिच्या 4 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी पारध पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पारध येथील सतीश भास्कर देशमुख यांच्या विहिरीत रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या मायलेकीचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. ग्रामस्थांच्या मदतीने या महिलेची ओळख पटली असून ती सावंगी येथील रहिवाशी होती असे कळाले आहे. 


पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मायलेकीचे मृतदेह विहीरीबाहेर काढले आहेत. त्या महिलेची ओळख सुनीता शंकर पायघन असून ती 28 वर्षांची होती. ती सावंगी येथील रहिवासी शंकर पायघनची पत्नी होती. तर तिच्या अवघ्या 4 वर्षीय मुलीचे नाव आरती असे होते. पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणात प्रथमदृष्ट्या अकस्मात मृत्यूची नोंद केली. तरीही या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आत्महत्येचा संशय वाटत असला तरीही अधिकृत माहिती तपासानंतरच समोर येईल. यासंदर्भातील पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदामा भागवत करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...