आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेट एअरवेजचे दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमान; ऑक्टोबरपासून घेणार उड्डाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जेट एअरवेजने ऑक्टोबरपासून सकाळच्या वेळी दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमान सुरू करण्याची घोषणा केली आहे.  तब्बल ४ वर्षांच्या खंडानंतर सकाळी दिल्ली-औरंगाबाद हवाई सेवेने जोडले जाणार आहे. औरंगाबादेतील बैठकीत जेट एअरवेजचे वरिष्ठ महाव्यवस्थापक नवील मेहता ही घोषणा केली. यासाठी दिल्लीत स्लॉट मिळण्याची अपेक्षाही त्यांनी विमानतळ प्राधिकरणाकडे व्यक्त केली.  सध्या दिल्लीसाठी एअर इंडियाचे एकमेव विमान संध्याकाळी आहे.


जेट एअरवेजचे एरिया मॅनेजर सईद अहमद जलील म्हणाले, हे विमान सकाळी ८:३० ते १० च्या दरम्यान दिल्लीहून निघेल. ११ ते १२:३० दरम्यान औरंगाबादहून परत जाईल. कंपनी सकाळी ५, ६ वाजेची वेळही घेऊ शकली असती. मात्र, आम्हाला फक्त दिल्लीतून नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतातील प्रवासी मिळवायचे होते.

बातम्या आणखी आहेत...