आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेरच्या बीडीअोंची विहिरीसाठी शेतकऱ्याकडे ५० हजार रुपयांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राेजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या विहिरीचे कार्यारंभ अादेश देण्यासाठी पैसे न मिळाल्याने जामनेर येथील गट विकास अधिकारी ए. बी. जाेशी यांनी विहिरीची प्रशासकीय मान्यता रद्द केली हाेती. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अादेशालादेखील केराची टाेपली दाखवून ५० हजार रूपयांच्या मागणीवर ठाम असलेल्या बीडीअाेंच्या चाैकशीचे अादेश जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी जलव्यस्थापन समितीच्या बैठकीत शुक्रवारी दिले. या वेळी प्रशासनाकडून तातडीने चाैकशीचे अाश्वासन देण्यात अाले. 


जामनेर तालुक्यातील भारूडखेडे येथील शेतकरी भरतसिंग शेनफडू पाटील यांना राेजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजूर हाेऊन १७ मे २०१७ राेजी प्रशासकीय मान्यता दिली हाेती. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर कार्यारंभ अादेश मिळवण्यासाठी पंचायत समितीकडे वर्षभर पाठपुरावा करूही कार्यारंभ अादेश दिला नाही. विहिरीच्या कार्यारंभ अादेशासाठी ग्रामसेवक ज्ञानेश्वर बाेरसे व तांत्रिक सहाय्यक प्रशांत वाघ यांच्यामार्फत बीडीअाे ए. बी. जाेशी यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली हाेती. यासंदर्भात शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर तत्कालीन े सीईअाे काैस्तुभ दिवेगावकर यांनी बीडीअाे जाेशी यांना विचारणा करून कार्यारंभ अादेश देण्याच्या सूचना केल्या हाेत्या. 


वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा राग अाल्याने बीडीअाे जाेशी यांनी १५ मार्च २०१८ राेजी सदर विहिरीची प्रशासकीय मान्यता रद्द केली हाेती. बीडीअाेंच्या कारवाईसंदर्भात शेतकरी भरतसिंग पाटील यांनी सीईओंकडे तक्रार केली हाेती. तक्रारीच्या अनुषंगाने कृषी अधिकारी एम. एस. धांडे, विशेष तांत्रिक अधिकारी चेतन महाजन यांच्या पथकाला चाैकशीचे अादेश देत अहवाल मागवला हाेता. या पथकाने प्रत्यक्ष चाैकशी करून बीडीअाेंची कारवाई ही चुकीची असल्याचा अहवाल सीईअाेंना दिला हाेता. 


अाज हाेणार चाैकशी 
सीईअाेंच्या अादेशानंतरही कार्यारंभ अादेश न मिळाल्याने शेतकऱ्याने राेहयाे मंत्री जयकुमार रावल, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, सीईअाे शिवाजी दिवेकर यांच्याकडे तक्रार केली हाेती. या अनुषंंगाने बीडीअाे जाेशी यांची चाैकशी करावी, त्यांनी इतर किती शेतकऱ्यांकडून पैसे घेतले यासंदर्भात चाैकशीची मागणी सदस्य लालचंद पाटील यांनी बैठकीत केली. या संदर्भात अध्यक्षा पाटील यांनी चौकशीचे अादेश दिले तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी शनिवारीच बीडीअाे जाेशी यांना बाेलवून चाैकशी करणार असल्याचे बैठकीत सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...