आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलप्रकरणी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना तत्काळ बडतर्फ करा, भिक्खू संघाची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कोरेगाव भीमा दंगलीस पुण्याचे पोलिस आयुक्त जबाबादार असून त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी करत भिक्खू संघाने भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी सायंकाळी पाचपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

 

महाराष्ट्र भिक्खू संघाने शहातून सद्भावना रॅली काढून याप्रकरणी उचित कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन दिले होते. यात पुणे येथील पोलिस आयुक्तांना बडतर्फ करावे, हीच प्रमुख मागणी होती. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा या रॅलीत दिला होता. त्यानुसार कोणत्याच मागण्या मान्य न झाल्याने भिक्खू संघाने बेमुदत उपोषण सुरू केले. यात प्रामुख्याने भदंत बोधिपालो महाथेरो, भदंत सुगतबोधी महाथेरो, भदंत आनंदबोधी महाथेरो, भदंत करुणानंद थेरो, भदंत सुदत्तबोधी, भदंत संघप्रिय यांच्यासह एकूण ४० भन्ते या ठिकाणी उपस्थित होते.

 

पाच प्रमुख मागण्या : भिक्खू संघाची भूमिका मांडताना भदंत बोधिपालो महाथेरो म्हणाले, पाच प्रमुख मागण्यांसाठी आम्ही बेमुदत उपोषण करत आहोत. यात पुण्याच्या पोलिस आयुक्तांना विनाविलंब सेवेतून बडतर्फ करावे, कोरेगाव भीमा प्रकणावरून १ जानेवारीनंतर ज्या ज्या ठिकाणी दंगली झाल्या व कलम ३०७ कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला त्या सर्वाना गुन्ह्यातून विनाशर्त मुक्त करावे. मनोहर उर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर अॅट्रॉसिटी व मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, निरपराधांवर आकसाने खोटे गुन्हे दाखल केले असून त्याची न्यायालयीन चौकशी व्हावी, अन्यायग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी.

 

बातम्या आणखी आहेत...