आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीट स्थानकावर पुन्हा आढळली स्फोटके; \'फाॅरेन्सिक\'कडे पाठविली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिवंत स्फोटके निर्जन भागात नष्ट करताना मालेगाव येथील बाॅम्बशाेधक पथकासह चांदवड येथील पोलिस ठाण्याचे  कर्मचारी. - Divya Marathi
जिवंत स्फोटके निर्जन भागात नष्ट करताना मालेगाव येथील बाॅम्बशाेधक पथकासह चांदवड येथील पोलिस ठाण्याचे कर्मचारी.

चांदवड- तालुक्यातील समीट रेल्वेस्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीने टाकलेले मोदकांच्या आकाराची स्फोटके परिसरातील कुत्र्यांनी तोंडात धरल्याने त्यांचा स्फोट होऊन तीन कुत्रे जागीच ठार तर एका कुत्र्याचे तोंड फाटल्याची घटना गुरुवारी (दि. १) सायंकाळच्या सुमारास घडली होती. स्फोटकांचा शोध घेऊन दोन जिवंत स्फोटके पोलिसांनी नष्ट केली हाेती. शनिवारी आढळलेले एक स्फोटक तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


समीट रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात व्यक्तीने मोदकांच्या आकारांची काही स्फोटके आणून टाकून दिली होती. गुरुवारी (दि. १) दुपारी व सायंकाळच्या सुमारास परिसरातील मोकाट कुत्र्यांनी ही स्फोटके तोंडात धरल्याने त्यांचा स्फोट होऊन तीन कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला हाेता. याचबराेबर एका कुत्रा गंभीर जखमी झाला हाेता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोतदार, पोलिस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी यांच्यासह मनमाडचे पोलिस अधिकारी, रेल्वे पोलिस अधिकारी, एटीएस पथक, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री परिसरात शोध घेतला हाेता. मात्र,, अंधारामुळे तपासात अडथळा आला. शुक्रवारी (दि. २) पोलिसांना घटनास्थळी मोदकाच्या आकाराची दोन जिवंत स्फोटके आढळून आली. ती तत्काळ नष्ट केली हाेती. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


बाॅम्बशाेधक पथकाची तपासणी 
समीट रेल्वेस्थानकाजवळील राजेंद्र बाबूराव चिंचोले यांच्या घरासमोर शनिवारी (दि. ३) दुपारी १२ वाजेच्या सुमारास मोदकाच्या आकाराचे स्फोटक आढळून आले. याबाबत माहिती मिळताच मालेगाव येथील बॉम्बशोधक पथकाचे उपनिरीक्षक सचिन गायकवाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक पी. एम. सोनवणे, भामरे, वाघ, मोरवाळ, चांदवडचे पोलिस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक रामकृष्ण जगताप, अशोक फुलमाळी, बी. एच. चव्हाण, सलीम शेख, एस. ए. शेवाळे यांनी परिसराची तपासणी केली. यावेळी आढळलेले स्फोटक पोलिसांनी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहे. 

बातम्या आणखी आहेत...