आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आणि मीच आमदार होणार- धनंजय मुंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- औष्णिक वीज निर्मितीमुळे देशाच्या नकाशावर असलेल्या परळी शहरात आता सौर ऊर्जेची निर्मिती होऊ लागल्यामुळे या भागाला नवी ओळख निर्माण झाली आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, या भागातील जनतेचे एमआयडीसीचे स्वप्न मीच पूर्ण करुन दाखवेल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला आहे. 2019 ला या भागाचा आमदार मीच असेल, असाही दावा त्यांनी यावेळी केला.


परळी तालुक्यातील मलनाथपूर येथे 500 कोटी रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या 80 मेगावॅट खासगी सोलार पॉवर प्रकल्पाचे उद्‍घाटन शुक्रवार धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाचे उद्‍घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र हवामान बदलामुळे त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने धनंजय मुंडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्यात आले. 

 

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातील वणीच्या एका कार्यक्रमात आपण वणीसाठी परळीची जागा सोडू, असे वक्तव्य केले ते तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे यासाठी केले होते. त्यामुळे स्थानिक विरोधकांना आनंद झाला होता.  मात्र परळीतील जनतेची इच्छा असल्याने 2019 ला मीच या भागाचा आमदार असेल, असे धनंजय मुंडे म्हणाले.

 

परळी तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत राज्य व केंद्रातील भाजप सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे परळीच्या विकासाला चालना मिळावी, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी हा प्रकल्प उभारल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

 

शापुरजी पालनजी यांच्या सोलार एज पॉवर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि व स्टर्लिंग अ‍ॅण्ड विलियम्स या कंपन्यांनी परळी तालुक्यात 500 कोटी रूपये खर्चुन 80 मेगा वॅट वीज निर्मितीचा हा सोलार प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी मलनाथपूर, वाघाळा, म्हातारगांव या गावातील 400 एकर खडकाळ जमीन संपादीत करण्यात आली असून, त्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथून 80मेगा वॅट वीज निर्मिती सुरू झाली असुन, सदर वीज कंपनीतर्फे महाराष्ट्र शासनाला दिली जाणार आहे. अतिशय झपाट्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून, त्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असून यापुढेही अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खासगी क्षेत्रातील हा राज्यातील सर्वात मोठा सोलार प्रकल्प आहे. दिवाळी पाडव्याला भूमीपूजन झालेल्या या प्रकल्पातून आज 4 महिन्यात वीज निर्मिती सुरू झाली. 

 

या कार्यक्रमास बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री बजरंग सोनवणे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, जेष्ठ नेते बाळासाहेब आजबे, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा सिरसाट, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई फड, महेंद्र गर्जे, नरहरराव निर्मळ, तालुकाध्यक्ष ऍड गोविंदराव फड, पंचायत समिती सभापती मोहनराव सोळंके, मार्केटचे सभापती सूर्यभान मुंडे, उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष रणजित लोमटे, उपसभापती तानाजीराव देशमुख, बबनराव लोमटे, शिवहार भताने, विलासकाका सोनवणे, गणेश देशमुख, जि प सदस्य प्रा. मधूकर आघाव, उपसभापती पिंटू मुंडे, संतोष शिंदे, जानेमिया कुरेशी, माजी शहराध्यक्ष चंदूलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, गटनेते वाल्मिकअण्णा कराड,  माऊली गडदे, डॉ संतोष मुंडे, विष्णुपंत देशमुख, सिराज भाई, युवक नेते अभय मुंडे, सतीश बडे, दादासाहेब मुंडे , राजाभाऊ पौळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शापुरजी पालनजी चे नितीन गांधी, सुनील कुलकर्णी, जरीन मिस्त्री, युवक नेते , जि. प सदस्य अजय मुंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक अजय मुंडे यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचलन माधव चाटे यांनी केले तर प्रा. मधुकर आघाव यांनी आभार मानले.

 

बातम्या आणखी आहेत...