आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया वापरासाठी कठोर नियमांचा बडगा, पोलिस महासंचालक पडसलगीकरांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या काही दिवसांत सोशल मीडियामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अफवांमुळे मारहाणीच्या घटना घडल्या. त्यात लोकांचा मृत्यूही झाला. त्यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी कठोर नियम बनवण्यात येणार आहेत. नेमकी पहिली पोस्ट कोठून आली, यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येईल. याशिवाय याबाबत जागरूकतेसाठीही प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली. पोलिस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या उद‌्घाटनासाठी ते शनिवारी शहरात आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलत होते.

 

पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आठ तासांच्या ड्यूटीचा उपक्रम पडसलगीकरांनी मुंबईचे पोलिस आयुक्त असताना राबवला होता. त्यामुळे पोलिस खात्यात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळाले होते. हा उपक्रम राज्य भरात राबवणार का, असे विचारले असता सध्या तरी हा उपक्रम मुंबईपुरताच मर्यादित असल्याचे त्यांनी सांगितले.

 

शहरातही दोन चौकशा प्रलंबित
मिटमिट्यात कचऱ्यावरून झालेल्या दंगलीत पोलिसांनी लोकांवर अत्याचार केल्याचा आरोप करत नागरिकांनी त्याचे सीसीटीव्ही फुटेजही सादर केले. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. ११ मे रोजी जुन्या शहरात झालेल्या दंगलीबाबत पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही. विशेष शाखेला दंगलीची कल्पना नव्हती आणि दंगलीपूर्वीच्या घटनांबाबत पोलिसांनी वेळीच कारवाई केली नसल्याच्या आरोपांवर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही.

 

'आयडीबाय'ला 'देवगिरी'च्या नावे मेल; १० लाखांचा गंडा
आले होते. नेहमीचा व्यवहार असल्याने पांडे यांनी दहा लाख रुपये पाठवून दिले. त्यानंतर देवगिरी बँकेच्या अधिकाऱ्यांना काॅल करून सांगितले. परंतु देवगिरी बँकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र आम्ही असा कुठलाही मेल केलाच नसल्याचे सांगितले. त्यानंतर क्रांती चौक पोलिसांत याप्रकरणी तक्रार देण्यात आली. सदर खाते एचडीएफसीमध्ये शबरी एंटरप्रायजेस नावाने असून ते मथुरेतील असल्याचे समोर आले आहे. आरोपीने खात्यात पैसे जमा होताच दिल्लीवरून ३ लाख ६० हजार रुपये काढून घेतले. परंतु फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्याने एचडीएफसी बँकेला सांगून खाते तात्पुरते बंद करण्यात आले. मेल हॅक करून हा प्रकार केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून तसे सायबर विभागाला कळवण्यात आले आहे. पुढील तपास निरीक्षक अनिल गायकवाड करत आहेत.

 

दोषी पोलिसांच्या चौकशीसाठी कालमर्यादा
राज्यात विविध प्रकरणांत पोलिस दोषी असल्याचा आरोप केला जातो. त्यानंतर त्या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीचे आदेशही दिले जातात. मात्र चौकशीसाठी वेळेची निश्चिती नसते. यापुढे अशा चौकशीसाठी वेळेची मर्यादा असेल, असे पडसलगीकर म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...