आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांनंतर घाटीतील निवासी डॉक्टर परतले कामावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- निवासी डॉक्टरांच्या सात मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दोन दिवसांपासून सामूहिक रजेवर गेलेले घाटीतील निवासी डॉक्टर शनिवारी कामावर परतले. 


शनिवारी सकाळी ९ वाजता निवासी डॉक्टरांनी कामावर येत असल्याचे जाहीर केले. यानंतर १० वाजता शहर पोलिसांनी घाटीच्या सुरक्षा यंत्रणेचे ऑडिट केले. या वेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, महाराष्ट्र सुरक्षा बल औरंगाबादचे प्रमुख सत्यनारायण जैस्वाल उपस्थित होते. 


मकई गेटकडील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल, घाटी परिसरात बॅरिकेड्स, नातेवाइकांसाठी पास यंत्रणा कार्यान्वित केली जाईल आदी मागण्या मान्य करण्यात येत असल्याचे पत्र डॉ. येळीकर यांनी निवासी डॉक्टरांना दिले. त्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकांशी संवाद साधला. 

बातम्या आणखी आहेत...