आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैज्ञानिक आधार समजत नाही म्हणून संशोधन नाकारू नका; डाॅ. काकोडकर यांचा सत्यपाल सिंह यांना सल्ल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मला शास्त्रज्ञांनी संशोधनाला दिलेले आधार समजत नाहीत म्हणून ते संशोधनच नाकारायचे, याला अर्थ नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. एका कार्यक्रमासाठी आलेले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.


वैदिक संमेलनासाठी शहरात आलेल्या सत्यपाल सिंह यांनी डार्विनचा माणसाच्या उत्पत्तीचा सिद्धांत खोटा प्रतिक्रिया विचारली. तेव्हा त्यांनी डार्विनच्या संशोधनाला पुराव्यांचा आधार असल्याचे सांगत सत्यपाल सिंह यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. म्हणाले की, डार्विनने मनुष्याच्या उत्क्रांतीबाबात केवळ थिअरी मांडली नाही तर त्याचे पुरावेही दिले.त्याच्या आधारावरच पुढे विज्ञानात अनेक शोध लागले.त्याला आव्हान देणारे संशोधन मांडायचे असेल तर ते तावून सुलाखूनच घ्यायला हवे. आपल्याला पुढे जायचे आहे की, आपण आधी ठरवले पाहिजे. आपली सांस्कृतिक परंपरा खूप जुनी आहे. ज्ञानाची आहे. त्या ज्ञानाच्या आधारावर आपण पुढे गेले पाहिजे. विज्ञानात प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेतली पाहिजे. तुम्ही सांगितले त्यावर मी विश्वास ठेवला तर याला ज्ञान म्हणता येणार नाही. मला आधार समजत नाही म्हणून तो नाकरण्यात काही अर्थ नाही.

 

शिक्षण पद्धतीवर टीका
डॉ. काकोडकर यांनी सध्याच्या अभ्यासक्रमांवरही टीका केली. ते म्हणाले की, स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली तरी शिक्षणपद्धती बदलल्या नाहीत. शिक्षकांचा ९० टक्के वेळ परीक्षेची कामे करण्यात जातो. मग नवी संशोधने कुठून येणार?

बातम्या आणखी आहेत...