आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. अशोक तेजनकर पहिल्या प्र-कुलगुरुपदी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या प्र-कुलगुरुपदी देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगर्भतज्ज्ञ डॉ.अशोक तेजनकर यांची निवड झाली. तसे नियुक्तिपत्र राज्यपाल कार्यालयाने दिले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी १६ सप्टेंबर २०१७ रोजी तीन जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. तेजनकर यांना शिक्षण, प्रशासन, भूगर्भ संशोधन क्षेत्रातील २९ वर्षांचा अनुभव आहे. पाण्याच्या क्षेत्रातील संशोधन प्रकल्प, स्किल इंडिया प्रकल्पात सहभाग, महाराष्ट्र-इस्रायल जलनियोजन समितीवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. ३ वर्षांत प्रथमच राज्यपाल नियुक्त पूर्णवेळ अधिकारी विद्यापीठाला मिळाला आहे.
बातम्या आणखी आहेत...