आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात बसताच डॉ. निपुण म्हणाले, मी मनपा आयुक्त, शहराच्या समस्या काेणत्या? त्या कशा सोडवू ते सांगा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 'नमस्कार ! मी डॉ. निपुण विनायक. औरंगाबाद महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून रुजू व्हायला चाललो आहे. शहराच्या मुख्य समस्या काय आहेत? त्या सोडवण्यासाठी काय केले पाहिजेत? त्याबाबत काही सूचना असतील तर अवश्य सांगा' असे म्हणत नवे महापालिका आयुक्त मुंबईत औरंगाबादकडे येेणाऱ्या विमानात बसताच ओळख करून देत प्रत्येक प्रवाशाच्या हाती चिठ्ठी दिली. एक तरुण आयएएस अधिकारी पदभार स्वीकारण्याआधीच शहराच्या समस्या जाणून घेऊ इच्छितो आणि विकासाबद्दलच्या काय अपेक्षा आहेत, याचीही ओळख करून घेऊ इच्छितो म्हटल्यावर विमानातील ३० औरंगाबादकर प्रवाशांनी शहरातील मुख्य समस्या आणि त्या सोडवण्याचे मार्गही सुचवले. विमान प्रवासाच्या एक तासाच्या वेळेत त्यांनी औरंगाबादकरांकडूनच औरंगाबाद जाणून घेतले. काही प्रवाशांनी कचरा हीच मुख्य समस्या असल्याचे सांगितले, तर काहींनी रस्ते, पाणी, सिटी बस सेवेला प्राधान्य दिले. 


बँडेज नव्हे, पूर्ण ट्रीटमेंट करू 
कचरा व पाण्याच्या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी केली जाणार नाही, तर पूर्ण ट्रीटमेंटच केली जाईल, असे एमबीबीएस डॉक्टर असलेल्या निपुण यांनी सांगितले. प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यावर ते भर देणार असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. 


नागरिकांसाठी ट्विटर हँडलर 
महापालिकेत फक्त १ टक्का नागरिक येतात. उर्वरित नागरिकांशी संवाद साधता यावा यासाठी आयुक्तांनी स्वतंत्र ट्विटर हँडलर सुरू केले आहे. या हँडलरवर नागरिकांनी त्यांचे प्रश्न, सूचना मांडाव्यात, त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल, त्याद्वारे मी संपर्कात असेन, असे डॉ. निपुण म्हणाले. commissioner_aurangabad असे हे ट्विटर हँडलर बुधवारपासून सुरू झाले.

बातम्या आणखी आहेत...