आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा विद्यापीठ कुलगुरूपदी नियुक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाचे निवृत्त विभागप्रमुख तथा उदार कला विभागाचे विद्यमान संचालक डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झालेले ते पहिलेच प्राध्यापक आहेत. 


इतिहासाचे प्राध्यापक, भारतीय पुरातत्त्व खात्यात सहायक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी विविध कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र व परिषदांमधून सातशेपेक्षा अधिक शोधनिबंध सादर केले आहेत. त्यातील ५०० निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्धही झाले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी त्यांना आयक्वॅकचे संचालक म्हणून कार्यभार दिला होता. त्याशिवाय तीन वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी अॅकॅडमिक स्टाफ कॉलेजच्या (विद्या प्रबोधिनी) संचालकपदी काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...