आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत एसटी चालकाचा हार्टअटॅकने मृत्यू; कामावर रुजू होण्यास दवाब टाकल्याचा संपकरी कर्मचार्‍यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- राज्य परिवहन महामंडळाने मंजूर केलेली वेतनवाढ मंजूर नसल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचा-यां संपावर गेले आहेत. आज दुस-या दिवशीही संप कायम असून. हिंगोलीत एका एसटी ड्रायव्हर हार्ट अटॅकचा मृत्यू झाला आहे. संपकरी कर्मचा-यांनी कामावर रुजू होण्यासाठी दबाव वाढल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली आगारातून सकाळापासून काही प्रमाणात एसटी बसेसची वाहतुक सुरु होती पण चालक बी.डी. अवचार यांचा आज सकाळी मृत्यू झाला. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उदयसिंग चंदेल यांच्यासह फौजफाटा दाखल झाला असून तपास सुरु आहे. दरम्यान चालकाला ड्युटीवर येण्यास दबाव आणल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप असून त्यातूनच हृदय विकाराच्या झटकयाने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दुपारी एक वाजल्यापासून एकही बस हिंगोली आगारातून बाहेर पडली नाही.

बातम्या आणखी आहेत...