आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डमी परीक्षाथ्याने दिली ऑनलाइन स्पर्धा परीक्षा; पर्यवेक्षेकांच्या सतर्कतेमुळे उघड झाला प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन- डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल अडमिनिस्ट्रेशन विभागाच्या वतीने क्लास -सी, कर निर्धारक, पदासाठी घेण्यात येत असलेल्या ऑनलाइन स्पर्धा परीक्षेत गणपती शाळेच्या केंद्रावर दुसऱ्याच्या नावाने परीक्षा देणा-या डमी परीक्षार्थ्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे. पर्यवेक्षंकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. राज प्रेमसिंग नाऱ्हेडे (रा.निहालसिंगवाडी, ता. आंबड) असे या डमी परीक्षार्थीचे नाव आहे.

 

या प्रकरणी शासनाने ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी अधिकृत केलेल्या आर्क्युस इन्फोटेक प्रा लि, मुंबई कंपनीचे भोकरदन केंद्र सुपरवायझर कृष्णा संजय सोळुंके (रा.भक्तीनगर, औरंगाबाद ) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (ता.18) सकाळी 9:30ते 11 या वेळेत गणपती शाळेच्या परीक्षा हॉलमध्ये पहिल्या सत्रातील ऑनलाइन परीक्षा सुरू होती. यासाठी 130 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. पर्यवेक्षक रामदास गिरी हे परीक्षार्थींचे प्रवेशपत्र, ओळखपत्र व इतर तपासणी करताना सीट क्र 125 वर अनिल देविदास चव्हाण (रा.सोनखेडा तांडा ,जि.परभणी ) या मूळ परीक्षार्थीच्या ऑनलाइन फोटो व सही व प्रत्यक्ष परीक्षा देणारा परीक्षार्थी यांच्यात तफावत आढळून आली. गिरी यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सुपरवायझर कृष्णा सोळुंके यांना बोलावून माहिती दिली. व तोतया परीक्षार्थी युवराज प्रेमसिंग नाऱ्हेडे याला पकडले. 

 

या वेळी चौकशी करताना त्याने नाव सांगण्यास टाळाटाळ केली, त्याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने खरे नाव सांगितले. तोतया परीक्षार्थीच्या ताब्यातील अनिल चव्हाण या मूळ परीक्षार्थीचे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, परीक्षा प्रवेशपत्र, ताब्यात घेतले व तात्काळ पोलिसांना कळवून तोतया परीक्षार्थीला त्यांच्या ताब्यात दिले.

बातम्या आणखी आहेत...