आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकनाथ कारखान्यावर प्रशासक नेमणुकीचे आदेश, गाळप बंद झाल्यावर संचालकांना धक्का  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने विना परवानगी शिला अतुल शुगर टेकला चालविण्यास दिला त्यातच गाळप परवाना नसताना कारखाना सुरू केल्याने कारखाना व सध्या कारखान्यात अनियमिता असल्या कारखाने कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असुन प्रशासक म्हणून सहकार निबंधक विलास सोनट्के यांच्या नियुक्तीचे आदेश सह निबंध सहकारी संस्था च्या निबंधक तथा प्रादेशिक सह संचालक औरंगाबाद निलिमा गायकवाड यांनी दिले आहेत.


  

निलिमा गायकवाड यांनी 22 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की संत एकनाथ च्या संचालकांनी कारखान्याचे हिताच्या विरुद्ध कृत्य केले आहे. संचालक हे वैधानिक कार्य पार पाडत नाहीत, कारखान्याच्या संचालकांनी संस्थे च्या वित्तीयात नियम बाह्य काम करून आर्थिक नुकसान केले आहे, यातुन या संस्था चे आर्थिक नुकसान होण्याचा धोका असल्याचा ठपका ठेवत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, यातुन या कारखान्याच्या भवितव्य वर प्रश्न निर्माण झाला असून, सध्याचे विद्यमान संचालक मंडळाला पदावरुन काढण्यात येत आहे. या आदेशामुळे पैठण मध्ये एकच खळबळ उडाली आहे. यंदा जवळपास तीन लाख मे टन उसाचे गाळप करण्यात आले असून उस तोड कामगार, उस उत्पादक शेतकरी, कामगार यांच्या पेमेंटचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...