आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैलास लेणीची दीड लाख छायाचित्रे काढून सुरू केला फेसबुक कट्टा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जर्मन वंशाच्या थायलंडच्या ७२ वर्षीय पत्रकार क्रिस्टल पिल्झ यांनी वेरूळच्या कैलास लेणीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी फेसबुकवर 'फ्रेंड्स ऑफ कैलास, एलोरा' हा कट्टा सुरू केलाय. जगभरातील ६ हजार लोक या कट्ट्याचे सदस्य झाले आहेत. पिल्झ यांनी लेणीची दीड लाख छायाचित्रे काढली. या कट्ट्यावर दररोज पाच ते दहा छायाचित्रे टाकून त्याबाबतची शास्त्रीय माहिती दिली जाते.

 

२०१२ मध्ये क्रिस्टल पिल्झ वेरूळला आल्या आणि लेणी पाहून थक्कच झाल्या. अशी अदभुत लेणी मी जगाच्या पाठीवर कुठेही पाहिली नाही, असे त्यांचे उदगार होते. तेव्हापासून त्या वर्षातून दोन वेळा येथे येतात. ५ दिवस मुक्काम करतात. छायाचित्रे काढतात. ती छायाचित्रे फेसबुक कट्ट्यावर पोस्ट करून लेणीची शास्त्रीय माहिती देतात. कैलास लेणी जगातील महत्वाचे आध्यात्मिक ऊर्जा स्रोत असल्याचे त्या सांगतात.

 

जर्मन महिला पत्रकार क्रिस्टल पिल्झ यांचा उपक्रम
लेणीखाली सात तळघरे : कैलास लेणीत महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी राहिल्याचा उल्लेख केला. सध्याच्या लेणीखाली सात तळघरे असल्याचा उल्लेख केला आहे. अशी नाविन्यपूर्ण माहिती पिल्झ दररोज देत आहेत. या कट्ट्याला भेट देण्यासाठी https://www.facebook.com/Friends-of-Kailash-Ellora-1501628030114734/ या लिंकवर जा.

 

लेणीच्या भौमितीय गणितांवर परिसंवाद
कैलास लेणीची भौमितीय गणिते त्यांनी नुकतीच फेसबुकवर समजावून सांगितली. त्याला जगभरातील लोकांचे शेकडो लाइक आले आहेत. लेणी व शिल्पे कशी खोदली, त्याच्या भौमितीय आकृत्या काढून त्यावर परिसंवाद घडवून आणला. जगभरातील अनेक लोकांनी यानिमित्ताने वेरूळला येण्याचा संकल्प केला.