आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या नावाने फेसबुक अकाउंट उघडले, त्यावर रोज टाकायचा अश्लील छायाचित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पैशांची देवाणघेवाण इतर जुन्या वादातून एका तरुणाने महिलेच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट सुरू करून तिची बदनामी केली. महिलेने तक्रार देताच तीन दिवसांतच सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अली बिन मोहंमद अल खलिफी (३५, रा. फातेसिंगपुरा) याला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


तक्रारदार महिला विवाहित असून सुशिक्षित आहे. महिलेच्या कुटुंबासोबत अली बिन मोहंमदचे वाद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी त्याने महिनाभरापूर्वी महिलेच्या नावाने फेसबुकवर खोटे अकाउंट तयार केले. त्यावर रोज अश्लील छायाचित्र टाकायला सुरुवात केली. मध्यंतरी एक अश्लील छायाचित्र टाकून त्यावर तक्रारदार महिला तिच्या पतीचा मोबाइल क्रमांक टाकला. पोस्ट व्हायरल हाेऊन दांपत्याला कॉल येऊ लागले. तिच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट सुरू असल्याची माहिती मिळाली. महिलेने सायबर विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी तपास करून मंगळवारी दुपारी खलिफीला अटक केली. 


पोलिसांनी अकाउंट बंद केले तर पुन्हा सुरू केले 
पहिल्यांदातक्रार येताच सायबर विभागाने महिलेच्या नावाने सुरू असलेले अकाउंट बंद करून पुढील तपास सुरू केला. परंतु अली बिन मोहंमदने काही तासांत पुन्हा दुसरे अकाउंट सुरू केले. हा प्रकार पाहून पोलिसांसह महिलेलाही धक्का बसला. 


काही वर्षे विदेशात होता 
विवाहितअली बिन मोहंमद सध्या बेरोजगार आहे. काही वर्षे विदेशात काम करून वर्षभरापूर्वी भारतात आला. मोबाइल अॅपवरून त्याने महिलेच्या नावाने दुसरे बनावट खाते तयार करून हा गैरप्रकार केला. 

बातम्या आणखी आहेत...