आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उटखेडा येथील शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू; रावेर तालुक्यातील दुसरा बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर- उटखेडा येथील शेतकऱ्याचा गुरुवारी उष्माघाताने मृत्यू झाला. मधुकर रामदास महाजन (वय ६६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रावेर तालुक्यातील हा उष्माघाताचा दुसरा बळी ठरला. 


उटखेडा येथील रहिवासी मधुकर रामदास महाजन हे बुधवारी शेतात गेले होते. दुपारी शेतातून घरी परतल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे     त्यांनी गावातील डाॅक्टरांकडे उपचार घेतला. यानंतर रात्री त्रास वाढल्याने त्यांना रावेर येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.योगेश पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच ते मृत झाले होते. मधुकर महाजन हे वीज कंपनीतून वायरमन पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...