आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना दुधाचा याेग्य दर न देणारे संघ बरखास्तच करणार : मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाखगंगा (ता. वैजापूर) येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी माेफत दूध वाटप करून सरकारचा अनाेखा निषेध केला. छाया : प्रशांत त्रिभुवन - Divya Marathi
लाखगंगा (ता. वैजापूर) येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी माेफत दूध वाटप करून सरकारचा अनाेखा निषेध केला. छाया : प्रशांत त्रिभुवन

 मुंबई - राज्य सरकारने दुधासाठी निश्चित केलेला २७ रुपये प्रतिलिटर दर देण्याबाबतच्या नोटिसा सर्व दूध संघांना जारी केल्या आहेत. सरकारी दर न देणाऱ्या या दूध संघांवर सात दिवसांत बरखास्तीची कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिला. तसेच दुधाला हमीभाव देण्यासाठी कायदा करु, असे दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर म्हणाले.


दुधाला याेग्य दर मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांना अांदाेलन सुरु केले अाहे. ‘लुटता कशाला, फुकटच न्या’ असा नारा देत दूध उत्पादकांनी औरंगाबाद आणि परभणी, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, सोलापूर या जिल्ह्यांत गुरुवारी माेफत दूध वाटप करत सरकारचा निषेध केला. या आंदोलनात सात दिवस  रास्ता रोको, धरणे, मोर्चे काढले जातील.

बातम्या आणखी आहेत...