आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या मृत्यूचा शोध लावा हो, पित्याचा वाळूज पोलिस ठाण्यात टाहो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - बेपत्ता असलेल्या ट्रॅक्टरचालक तरुणाचा चार दिवसांनंतर एका विहिरीत मृतदेह आढळून आला. ही घटना संशयास्पद असून त्याच्या मृत्यूबाबत घातपात झाल्याचा संशय त्याच्या पित्याने व्यक्त केला आहे. माझ्या मुलाच्या गूढ मृत्यूचा शोध लावण्यात यावा, अशी मागणी करीत रावसाहेब यशवंत साबळे यांनी नातलगांसह वाळूज पोलिस ठाण्यासमोर शनिवारी लोटांगण घालत टाहो फोडला.


साबळे यांनी पोलिस आयुक्तांचीही भेट घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली. तेव्हा घटनेची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी वाळूज पोलिसांना दिले. वाळूजलगतच्या नवीन शिवराई येथील संपत साबळे हा तरुण विलास गवळी यांच्या ट्रॅक्टरवर कामाला होता. ४ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बाहेर जाऊन येतो, असे सांगून तो घराबाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे वडिलांनी ६ जून रोजी संपत बेपत्ता झाल्याची तक्रार वाळूज पोलिसात दिली. ७ जून रोजी संपतचा मृतदेह मेंदीपूर येथील विहिरीत आढळून आला. संपतचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाला नसून तो घातपाताचा प्रकार असल्याने त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, त्यातील दोषींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी संपतच्या नातलगांनी केली जात असून त्यांनी गावातील एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला असून पोलिसांकडे नाव दिले आहे.

 

ठिय्या आंदोलन
संपतच्या मृत्यूनंतर २० दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, पोलिस तपास धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे संपतच्या नातलगांमध्ये अस्वस्थता आहे. यासंदर्भात संपतच्या नातलगांनी १२ जून रोजी वाळूज पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर संपतचे वडील रावसाहेब साबळे यांनी पोलिसांसमोर लोटांगण घेतले. तेव्हा निवडक नातलगही होते.

 

बातम्या आणखी आहेत...